तांबे (कॉपर Cu) : तांबे हे अन्नद्रव्ये, प्रथिने व विकार निर्मितीमध्ये तसेच जैव रासायनिक
क्रियांना गती देण्यसाठी महत्वाचे असते. तांबे हे मातीमध्ये मिसळून व फवारणीद्वारे
पिकांना देता येते.वनस्पतींच्या श्वसन क्रिया, प्रकाश संश्लेषण, प्रथिने तयार
होण्यास आणि संप्रेरके तयार होण्यासाठी काही प्रथिनांमध्ये तांबे आवश्यक
असते.वनस्पतींच्या उतींना कणखरपनासाठी तांबे महत्वाचे असते.
तांबे अन्नद्रव्याचे पिक पोषनातील कार्य:
वनस्पती
शरीर कार्यातील महत्व: पिकांच्या वेगवेगळ्या परंतु महत्वाच्या जैवरासायनिक
क्रियेमध्ये तांबे महत्वाचे असते. पिकांची सर्वसाधारण वाढ आणि पुनरुत्पादन क्रिया
या वनस्पतींमध्ये असणार्या प्रथिने, विकारांमुळे होत असतात. वनस्पतींच्या श्वसन
क्रिया, प्रकाश संश्लेषण ,प्रथिने तयार होण्यास आणि संप्रेरके तयार होण्यासाठी
काही प्रथिनांमध्ये तांबे आवश्यक असते. त्याच प्रमाणे तांबे हरितद्रव्य
निर्मितीमध्येही गरजेचे असते.
कर्बोदके तयार करण्यासाठी: तांबे हे अन्नद्रव्ये, प्रथिने व विकार निर्मितीमध्ये तसेच जैव रासायनिक
क्रियांना गती देण्यसाठी महत्वाचे असते.तांबेयुक्त प्रथिने किंवा विकाराच्या
कमतरतेमुळे वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण व श्वसनक्रियेवर प्रतिकूल परिणाम
होतो.त्यामुळे वनस्पती कर्बोदके व्यवस्थित तयार करू शकत नाही. याचा परीणाम विपरीत
परिणाम वनस्पतीच्या वाढीवर होतो. त्यामुळेच तांबे कमतरता असणार्या जमिनीमध्ये पिके
पिवळी किंवा पांढरी दिसतात.
पुनरुत्पादन : डाळिंबात कॉपरची कमतरता असल्यास परागकणांचे उत्पादित ( वांझ ) राहिल्याने दाने
व्यवस्थित भरत नाहीत.
संप्रेरकांचे संतुलन: कॉपरच्या (तांबे)
कमतरतेमुळे विशेषतः आय.ए.ए संप्रेरकांच्या( हार्मोन्स ) कमतरतेमुळे बियाणांची
उग्वान्शक्ती कमी होते. पिकांमध्ये अनियमितता निर्माण होते.
No comments:
Post a Comment