मँग्नेशिअम (Mg)


मँग्नेशिअम (Mg): फुलधारणा व फळधारणा अवस्थेत झाडांना मँग्नेशिअमची गरज जास्त असते. या अवस्थेत फुल व फळ वाढीसाठी पिकांतील इतरर अवयवांतील मँग्नेशिअम जास्त खर्च होतो. त्यामुळे  फुल व फळ धारणा अवस्थेत पिकांना पुरेसे मँग्नेशिअम उपलब्ध न झाल्यास पिकांमध्ये मँग्नेशिअमची कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
मँग्नेशिअमचे पिकांतील कार्य:
-    हरितद्रव्य तयार होण्यासाठी मँग्नेशिअमची गरज असते. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये मँग्नेशिअम महत्वाची भूमिका बजावते.
-    मँग्नेशिअममुळे पिकांतील संप्रेरके व त्यांचे कार्य यांची गती वाढते.
-    पिकांत न्यूक्लिक आम्ल (RNA) तयार होण्यास कार्य करते.
-    पिकांमध्ये उर्जा साठवण क्रियेमध्ये मँग्नेशिअमची उपयुक्तता आहे.
-    पिकांमध्ये लोहाचा वापर जास्त होण्यास मँग्नेशिअम मदत करतो.
मँग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे:
-    मँग्नेशिअमच्या कमतरतेमुळे झाडांची पाने सुकून जातात आणि जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात व कालांतराने शिरांकडील भाग पिवळा पडतो.
-    मँग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानांतील हरीतद्र्व्यांचा अभाव जाणवतो व पाने लहान आकाराची दिसतात.

No comments:

Post a Comment