पालाश (Potash P)


पालाश (Potash P) : फळांची टिकवण क्षमता, फुलझाडांची देठे मजबूत व फुलांची प्रत सुधारण्यास , धान्य पिके, फळे, भाज्या यांचा  आकार व प्रत चांगली होण्यास पालाश गरजेचे असते.पिकांतील वेगवेगळ्या जीव रसायन क्रियेत व वनस्पतीच्या शरीर क्रियेत पालाशचे कार्य महत्वाचे आहे. त्यामुळे पिकांची संतुलित वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
सर्वच पिकांना पालाश ची गरज असते, परंतु ज्या पिकांत कार्बोदाकाचे प्रमाण जस्त असते अशा पिकांना पालाशची गरज जस्त असते.
पिकांतील पालाशच्या कमतरतेची लक्षणे:
-    पिकांमध्ये पालाश चे सर्वांगात लाकर वाहन होते व हे वाहन जुन्या उतीपासून ते नवीन उती असे होत असते.त्यामुळे पालाशच्या कमतरतेची लक्षणे प्रथम खालच्या किंवा जुन्या पानांवर दिसून येतात.
-    ज्या पिकांना पालाशची कमतरता असते अशा पिकांची वाढ हळूहळू होते, मुळांची वाढ व्यवस्थितरित्या होत नाही.
-    झाडांचे खोड मजबूत होत नाही त्यामुळे पिके लवकर आडवी पडतात.(उदा. मका)
-    दाण्याचा आकार लहान राहतो, पिके रोगांना लवकर बळी पडतात.
-    फळांना नैसर्गिक रंग येत नाही व त्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण कमी असते.

No comments:

Post a Comment