Tuesday, May 15, 2018

आले लागवड (Ginger-Cultivation)



गादीवाफ्यावर करा आले लागवड

आले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेने चार फुट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ से.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, अश्या पद्धतीने बेने लावावे.
आल्याची लागवड १५ मे ते १० जून या कालावधीत तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान करावी. मात्र ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असताना लागवड केल्यास उगवण क्षमता कमी होते, मंदावते किंवा बेने उष्णतेमुळे खराब होऊन जाते. काही वेळा उगवलेले आले पुढे जोम धरत नाही.
एक महिना साठवणूक केलेल्या बेण्यातून प्रत्यक्ष लागवडीकरिता ३ ते ४ डोळे अंकुरलेले व ३५ ते ५० ग्राम वजनाचे तुकडे मोडून , निवडून बेने प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ दिवस अगोदर तयार करावे. उर्वरित बेने बाजारात विकावे.
लागवड:
-    लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी.
-    लागवड करताना बेने चार फुट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ से.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, अश्या पद्धतीने बेने लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी ध्यावे.
-    यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास ३ ते ४ तासात एक एकर आले लागवड पूर्ण होते. त्यामुळे वेळ व मजुरी खर्चात बचत होते. परंतु त्यासाठी लागवडी अगोदर रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घ्यावे. त्यावर तुषार सिंचनाने पाणी देऊन जमीन वाफसा स्थितीत आणावी. त्यानंतर लागवड यंत्राच्या सहाय्याने चार फुटाचे गादीवाफे निर्मिती आणि लागवड एकाच वेळी करावी. त्यानंतर चार फुटावर ठिबक लॅटरल जोडून पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन
-    ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. पाणी, मजुरी खर्च बचत होऊन विद्राव्य खताची मात्रा सहज देता येते.
-    जमीन जर हलकी असेल तर ३० सें.मी. अंतर आणि जर जमीन मध्यम ते भारी असेल तर ४० सें.मी. अंतरावरील ४ लिटर डिस्चार्ज असलेले इनलाइन ड्रीपर निवडावेत.
-    गाडीवाफ्याची लांबी १५० ते २०० फूट असेल तर १६ एम.एम. व्यासाची लॅटरल आणि वाफ्यांची लांबी २०० फुटांपेक्षा जास्त असेलतर 20 एम.एम. व्यासाची लॅटरल निवडावी.
-    लागवड जर १५ ते ३० मे दरम्यान केली तर ठिबक सिंचनाबरोबर सूक्ष्म तुषार संच सुरवातीला दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरु ठेवावा. म्हणजे लागवड क्षेत्रामधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. बेण्याची उगवण लवकर होते. जूनमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर हा सूक्ष्म तुषार संच वापरणे बंद करावे.
बेने साठवणूक
      बेने थंड, कोरड्या, हवेशीर, सावलीच्या जागेत साठवून ठेवावे. साठवणूक करताना प्रथम ६ इंच जाडीचा वाळू किंवा विटांचा चौथरा करून घ्यावा. त्यावर ६ इंच जाडीचा कडूलिंबाचा पाला अंथरावा. त्यावर कार्बेनडाझीम ५० ग्राम, निंबोळी पावडर ५० ग्राम पसरून टाकून घ्यावी.त्यावर १ फुट जाडीचा बेण्याचा थर ध्यावा. त्यावर पुन्हा वारीप्रमाणे कडुलिंब पाला,  कार्बेनडाझीम, निंबोळी पावडर पसरावी.असे एकावर एक थर द्यावेत. साधारणतः ४ फुट उंचीचा बियाण्याचा ढीग करून ठेवावा. त्यावर शेवटी कडूलिंबाचा पाला पसरून त्यावर गोणपाट टाकून ढीग झाकून ठेवावा. त्यामध्ये हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.

बीजप्रक्रिया

रासायनिक बीजप्रक्रिया

      निवड केलेल्या बेण्यास लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी प्लास्टिक ड्रममध्ये १०० ग्राम कार्बेन्डाझीम + क्विनॉलफोस प्रती १०० लिटर पाण्यात चांगले मिसळून द्रावण तयार करावे. त्यात १५ मिनिटे निवडलेले बेने बुडवून ठेवावे. त्यानंतर बेने निथळून सावलीत सुकू ध्यावे.

जैविक बीजप्रक्रिया

      दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ ते २ तास अगोदर बेण्यास जैविक बीजप्रक्रिया करावी. याकरिता ५०० मिली किंवा ५०० ग्राम पी.एस.बी., ५०० मिली किवा ग्राम  अॅझोस्पिरीलीयाम जीवाणू संवर्धक आणि ५०० ग्राम गुल प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेने अर्धा तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवडीकरिता वापरावे.


स्त्रोत: अॅग्रोवन
अंकुश सोनावले (कृषी सहायक, नागठाणे, जि.सातारा)
: ९४२०४८६५८७