Thursday, August 9, 2018

जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर ( Use of Organic Fungicide : Trichoderma)


जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर
  • निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील काही पिकांसाठी रोगकारक असतात, तर काही बुरशी पिकांचे रोगांपासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा हि एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. या बुरशीचे कार्य , वैशिष्टे आणि रोग नियंत्रणातील महत्व याविषयी जाणून घेऊ.


  • कापूस , कडधान्य, तेलबिया, भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मार, मुल्कुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोवातीकेतील रोपे अचानक माना टाकतात. या रोगांसाठी फ्युजारीयम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा,पिथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. हि बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशींची वाढ होऊ देत नाही.

ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धती
  • ट्रायकोडर्मा हि विविध पद्धतीद्वारे वापरता येते. उदा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी, पिकांवर फवारणीद्वारे आणि क्षेंद्रिय खत निर्मितीकरिता उपयोग होतो.


बीजप्रक्रिया: 
  • ४ ग्रँम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीयेसाठी वापरावे.बियाणे स्वच्छ फरशी, प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर ४ ग्रँम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावी.
  • बियाणे ओलसर होईल, इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.
  • ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशीनाशकांसोबत करू नये.
  • ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.



ट्रायकोडर्माचे फायदे
  • ट्रायकोडर्मा या बुरशींची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवनशक्ती वाढण्यास मदत होते.
  • रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते.पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
  • जमिनीतील क्षेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीचा पोट सुधारतो.
  • ट्रायकोडर्मा हि बुरशी नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. रासायनिक बुरशीनाशकांप्रमाणे माती, पाणी, व पक्षी यांच्या आरोग्यास  धोका पोहचत नाही. हि बुरशी मातीतील क्षेंद्रिय पदार्थांवर वाढत असल्यामुळे रासायनिक बुरशीनाशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव टिकून राहतो. पिकांचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होते.


स्त्रोत: अॅग्रोवन
महेश देशमुख

ब्लॉग आवडला असल्यास कृषीदूत ला Follow करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया/ प्रश्न कमेंट्स च्या स्वरुपात आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया/ प्रश्नाचे योग्य पद्धतीने निरसन केले जाईल. 
      ब्लॉग बद्दल अपडेट्स तुमच्या ई-मेल वरती मिळवण्यासाठी तुमचा ई- मेल आइ-डी Enter your email address:  लिहलेल्या बॉक्स मध्ये टाईप करा.
कृषिदूत हा ब्लॉग शेतीसंभंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बनवण्यात आला आहे.