Friday, November 9, 2018

पिकांसाठी सिलिकॉन ठरते उपयुक्त अन्नद्रव्य/ Silicone


पिकांसाठी सिलिकॉन ठरते उपयुक्त अन्नद्रव्य

भातासारख्या पिकांच्या वाढीमध्ये सिलिकॉन महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध प्रयोगातून पुढे आले आहेत. सिलिकॉनमुळे उत्पादन वाढीसोबतच रोग किडींना अटकाव होण्यास मदत होते.
वनस्पतींना आवश्‍यक 16 मूलद्रव्यांसोबतच सिलिकॉन, सोडियम व कोबाल्ट ही अन्नद्रव्येही वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्‍यक आहेत. त्यांना उपयुक्‍त अन्नद्रव्ये असे म्हटले जाते.
·         मातीमध्ये सिलिकॉन हे उपलब्धतेनुसार दुसऱ्या क्रमांकाचे अन्नद्रव्य (28 टक्के) आहे.
·         उष्ण समशितोष्ण व आर्द्र समशितोष्ण हवामान विभागांमध्ये जमिनीची अधिक धूप होते. त्यामुळे लोह व ऍल्युमिनियम ऑक्‍साइड यांचे अधिक प्रमाण व सिलिकॉन व विम्लधारी खनिजे कमी असलेल्या जमिनी तयार होतात.
·         अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ व कमी प्रमाणात खनिजे असणाऱ्या जमिनीमध्येसुद्धा सिलिकॉनचे प्रमाण कमी असते. वारंवार घेतलेल्या पिकामुळे सिलिकॉनचे जमिनीतील प्रमाण कमी होते. त्यामुळे खतांद्वारे सिलिकॉनची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

सिलिकॉन अन्नघटकांची महत्त्वाची कार्ये 




सिलिकॉनच्या वापरामुळे पानांचा आकार वाढतो. प्रकाश संश्‍लेषण क्रिया अधिक प्रमाणात होते.सिलिकॉनमुळे वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ व टणक थर तयार होतो. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पिकांमध्ये नत्राचा अतिवापर किंवा मॅंगेनीज, फेरस इत्यादी अन्नद्रव्यांच्या अयोग्य वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यास सिलिकॉनमुळे मदत होते. - योग्य वेळी व योग्य प्रमाणात सिलिकॉन अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकांना दुष्काळी परिस्थितीतही तग धरण्याची शक्‍ती मिळते. पीक कणखर होऊन लोळत नाही. सिलिकॉनमुळे पांढरीमुळे निर्मितीला चालना मिळते. तसेच फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळाची प्रत सुधारते व टिकवणक्षमता वाढते. फळांना चकाकी येते.
सिलिकॉन संग्राहकतेनुसार पिके
सर्वसाधारणपणे द्विदल प्रकारातील पिकांमध्ये (कलिंगड या पिकाव्यतिरिक्‍त) सिलिकॉन कमी (0.5 टक्के पेक्षा ) प्रमाणात असते. अशा पिकांना सिलिकॉन असंग्राहक पिके असे म्हणतात. उदा. टोमॅटो, काकडी, सोयाबीन इ.
एकदल पिकांमध्ये सिलिकॉनचे प्रमाण (1.0 टक्केपेक्षा) जास्त आहे. अशा पिकांना सिलिकॉन संग्राहक पिके असे म्हणतात. उदा. गहू, जवस, ज्वारी, मका, भात व ऊस इ.
Poacease, Equisetaceae
आणि Cyperaceae या कुटुंबातील पिकांमध्ये सिलिकॉनचे प्रमाण प्रमुख अन्नद्रव्यांएवढे किंवा त्यापेक्षा जास्त असते. उदा. भातामध्ये सिलिकॉनचे प्रमाण नत्राच्या 108 टक्के एवढे असते. (म्हणजे भाताचे उत्पादन 5.0 मे. टन असल्यास 0.23 ते 0.46 मे. टन सिलिकॉन जमिनीतून काढून घेतला जाईल. पुढील भात पिकाच्या पानांतील सिलिकॉनचे प्रमाण 3.0 टक्के राखण्यासाठी साधारणपणे हेक्‍टरी 1.0 मे. टन सिलिकॉन टाकावा लागेल.)
सिलिकॉन हे एक महत्त्वाचे पूरक अन्नद्रव्य आहे. झाडांच्या विविध भागांमध्ये सिलिकॉनचे प्रमाण नत्र व पालाश यापेक्षा जास्त असते. सिलिकॉन वापरामुळे बॉटलब्रश/ हॉर्सटेल, भात, ऊस, गहू आणि इतर द्विदल पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर चांगले परिणाम आढळून आलेले आहेत.

वनस्पती सिलिकॉन कसे घेतात?

वनस्पती सिलिकॉन फक्‍त मोनोसिलिसीक ऍसिड किंवा ऑर्थोसिलिसील ऍसिड (Orthosilicoc acid) (H2 Sio4) या स्वरूपात शोषून घेतात. सिलिकॉन मुख्यत्वेकरून मुळाद्वारे पाण्याबरोबर शोषून घेतले जाते, या क्रियेस मास फ्लोस असे म्हणतात.
वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये व मुळांमध्ये सिलिकॉन ऑक्‍साइड (siO2) च्या रूपात जमा होतो. तसेच सिलिकॉन झाडांच्या अवयवांमध्ये मोनोसिलिसीक ऍसिड, कोलायडल सिलिसीक ऍसिड (Collodial Silicic acid) अथवा ऑरगॅनोसिलिकॉन पदार्थांच्या (Organosilicone compounds) रूपामध्ये साठून राहतात.
सिलिकॉन प्रथम झाडांच्या शेंड्याकडे साठवण्यात येतो. सर्वात जास्त सिलिकॉन पानांच्या वरच्या थरामध्ये (epiderma cells) साठविले जाते. यामुळे झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्‍ती तयार होते. अजैविक ताणनिर्मित विकृतीपासून झाडांचे संरक्षण होते.

सिलिकॉनच्या कमतरतेचे परिणाम





पाने, खोड व मुळे यांची वाढ मंदावते. झाडांची पाने व खोड मऊ व जास्त प्रमाणात खाली झुकलेली राहतात. कणखरता कमी असल्याने पीक लोळण्याचे प्रमाण वाढते.झाडांची रोग व कीड प्रतिकारक क्षमता कमी होते.
प्रकाश संश्‍लेषण क्रियेवर परिणाम.
उत्पादनात घट. भातामध्ये सिलिकॉनची कमतरता असल्यास प्रति चौ. मी. लोंब्यांची संख्या, प्रति लोंबी दाण्यांची संख्या कमी होते.

सिलिकॉन वापराचे फायदे 

मॅंगनीज व लोह अधिक्‍यामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांची तीव्रता सिलिकॉनमुळे कमी होते. तसेच ऍल्युमिनियमच्या अधिक्‍यासाठीही काही प्रमाणात फायदा होतो.
झाडामधील जस्त आणि स्फुरद यांचा कार्यक्षम वापरासाठीही सिलिकॉन वापरामुळे फायदा होतो.
उसामध्ये सिलिकॉन वापरामुळे रोगांचे प्रमाण कमी राहून, उत्पादनामध्ये वाढ होते.
भातामधील आर्सेनिक प्रमाण वाढणे, ही जागतिक समस्या होत आहेत. सिलिकॉनच्या वापराने आर्सेनिक प्रमाण कमी होईल. तसेच नैसर्गिकरीत्या भाताच्या रोग व कीड नियंत्रणास मदत होते.
गहू व वांगी या पिकांमध्ये सिलिकॉन वापराने कीड व रोगाला प्रतिबंध झालेला दिसून आला, तसेच उत्पादनाबरोबरच वांग्याचा तजेलदारपणा वाढल्याचे दिसून आले. असेच निष्कर्ष कांदा, गहू, लसूणघास, टोमॅटो यासारख्या पिकात दिसून आले.

उपलब्धता 

जमिनीमधील सिलिकॉन हे वाळूच्या स्वरूपात असल्याने उपलब्धता कमी असते. झाडे सिलिकॉनचा वापर फक्‍त सिलिसिक ऍसिडच्या (Silicic acid) रूपातच चांगल्याप्रकारे करतात. जमिनीमध्ये सिलिसिक ऍसिडचे प्रमाणे 1 ते 100 मिलिग्रॅम प्रति घन डेसीमीटर एवढे असते, त्यामुळे पिकांना विद्राव्य रूपातील सिलिकॉनयुक्‍त खताचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
- भारतामध्ये खत व्यवस्थापनामध्ये सिलिकॉन वापर अत्यल्प आहे. सिलिकॉनचे विविध रासायनिक स्त्रोत ः
स्रोत----सिलिकॉन प्रमाण
सिलिसिक ऍसिड----29.0 टक्के
कॅल्शिअम सिलिकेट स्लॅग----18 ते 21 टक्के
कॅल्शिअम सिलिकेट----24.0 टक्के
पोटॅशिअम सिलिकेट----18.0 टक्के
सोडिअम सिलिकेट----23.0 टक्के
वाळू----46.0 टक्के

स्त्रोत- अग्रोवन

Thursday, August 9, 2018

जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर ( Use of Organic Fungicide : Trichoderma)


जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर
  • निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील काही पिकांसाठी रोगकारक असतात, तर काही बुरशी पिकांचे रोगांपासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा हि एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. या बुरशीचे कार्य , वैशिष्टे आणि रोग नियंत्रणातील महत्व याविषयी जाणून घेऊ.


  • कापूस , कडधान्य, तेलबिया, भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मार, मुल्कुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोवातीकेतील रोपे अचानक माना टाकतात. या रोगांसाठी फ्युजारीयम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा,पिथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. हि बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशींची वाढ होऊ देत नाही.

ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धती
  • ट्रायकोडर्मा हि विविध पद्धतीद्वारे वापरता येते. उदा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी, पिकांवर फवारणीद्वारे आणि क्षेंद्रिय खत निर्मितीकरिता उपयोग होतो.


बीजप्रक्रिया: 
  • ४ ग्रँम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीयेसाठी वापरावे.बियाणे स्वच्छ फरशी, प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर ४ ग्रँम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावी.
  • बियाणे ओलसर होईल, इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.
  • ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशीनाशकांसोबत करू नये.
  • ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.



ट्रायकोडर्माचे फायदे
  • ट्रायकोडर्मा या बुरशींची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवनशक्ती वाढण्यास मदत होते.
  • रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते.पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
  • जमिनीतील क्षेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीचा पोट सुधारतो.
  • ट्रायकोडर्मा हि बुरशी नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. रासायनिक बुरशीनाशकांप्रमाणे माती, पाणी, व पक्षी यांच्या आरोग्यास  धोका पोहचत नाही. हि बुरशी मातीतील क्षेंद्रिय पदार्थांवर वाढत असल्यामुळे रासायनिक बुरशीनाशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव टिकून राहतो. पिकांचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होते.


स्त्रोत: अॅग्रोवन
महेश देशमुख

ब्लॉग आवडला असल्यास कृषीदूत ला Follow करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया/ प्रश्न कमेंट्स च्या स्वरुपात आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया/ प्रश्नाचे योग्य पद्धतीने निरसन केले जाईल. 
      ब्लॉग बद्दल अपडेट्स तुमच्या ई-मेल वरती मिळवण्यासाठी तुमचा ई- मेल आइ-डी Enter your email address:  लिहलेल्या बॉक्स मध्ये टाईप करा.
कृषिदूत हा ब्लॉग शेतीसंभंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बनवण्यात आला आहे. 

Tuesday, May 15, 2018

आले लागवड (Ginger-Cultivation)



गादीवाफ्यावर करा आले लागवड

आले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेने चार फुट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ से.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, अश्या पद्धतीने बेने लावावे.
आल्याची लागवड १५ मे ते १० जून या कालावधीत तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान करावी. मात्र ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असताना लागवड केल्यास उगवण क्षमता कमी होते, मंदावते किंवा बेने उष्णतेमुळे खराब होऊन जाते. काही वेळा उगवलेले आले पुढे जोम धरत नाही.
एक महिना साठवणूक केलेल्या बेण्यातून प्रत्यक्ष लागवडीकरिता ३ ते ४ डोळे अंकुरलेले व ३५ ते ५० ग्राम वजनाचे तुकडे मोडून , निवडून बेने प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ दिवस अगोदर तयार करावे. उर्वरित बेने बाजारात विकावे.
लागवड:
-    लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी.
-    लागवड करताना बेने चार फुट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ से.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, अश्या पद्धतीने बेने लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी ध्यावे.
-    यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास ३ ते ४ तासात एक एकर आले लागवड पूर्ण होते. त्यामुळे वेळ व मजुरी खर्चात बचत होते. परंतु त्यासाठी लागवडी अगोदर रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घ्यावे. त्यावर तुषार सिंचनाने पाणी देऊन जमीन वाफसा स्थितीत आणावी. त्यानंतर लागवड यंत्राच्या सहाय्याने चार फुटाचे गादीवाफे निर्मिती आणि लागवड एकाच वेळी करावी. त्यानंतर चार फुटावर ठिबक लॅटरल जोडून पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन
-    ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. पाणी, मजुरी खर्च बचत होऊन विद्राव्य खताची मात्रा सहज देता येते.
-    जमीन जर हलकी असेल तर ३० सें.मी. अंतर आणि जर जमीन मध्यम ते भारी असेल तर ४० सें.मी. अंतरावरील ४ लिटर डिस्चार्ज असलेले इनलाइन ड्रीपर निवडावेत.
-    गाडीवाफ्याची लांबी १५० ते २०० फूट असेल तर १६ एम.एम. व्यासाची लॅटरल आणि वाफ्यांची लांबी २०० फुटांपेक्षा जास्त असेलतर 20 एम.एम. व्यासाची लॅटरल निवडावी.
-    लागवड जर १५ ते ३० मे दरम्यान केली तर ठिबक सिंचनाबरोबर सूक्ष्म तुषार संच सुरवातीला दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरु ठेवावा. म्हणजे लागवड क्षेत्रामधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. बेण्याची उगवण लवकर होते. जूनमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर हा सूक्ष्म तुषार संच वापरणे बंद करावे.
बेने साठवणूक
      बेने थंड, कोरड्या, हवेशीर, सावलीच्या जागेत साठवून ठेवावे. साठवणूक करताना प्रथम ६ इंच जाडीचा वाळू किंवा विटांचा चौथरा करून घ्यावा. त्यावर ६ इंच जाडीचा कडूलिंबाचा पाला अंथरावा. त्यावर कार्बेनडाझीम ५० ग्राम, निंबोळी पावडर ५० ग्राम पसरून टाकून घ्यावी.त्यावर १ फुट जाडीचा बेण्याचा थर ध्यावा. त्यावर पुन्हा वारीप्रमाणे कडुलिंब पाला,  कार्बेनडाझीम, निंबोळी पावडर पसरावी.असे एकावर एक थर द्यावेत. साधारणतः ४ फुट उंचीचा बियाण्याचा ढीग करून ठेवावा. त्यावर शेवटी कडूलिंबाचा पाला पसरून त्यावर गोणपाट टाकून ढीग झाकून ठेवावा. त्यामध्ये हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.

बीजप्रक्रिया

रासायनिक बीजप्रक्रिया

      निवड केलेल्या बेण्यास लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी प्लास्टिक ड्रममध्ये १०० ग्राम कार्बेन्डाझीम + क्विनॉलफोस प्रती १०० लिटर पाण्यात चांगले मिसळून द्रावण तयार करावे. त्यात १५ मिनिटे निवडलेले बेने बुडवून ठेवावे. त्यानंतर बेने निथळून सावलीत सुकू ध्यावे.

जैविक बीजप्रक्रिया

      दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ ते २ तास अगोदर बेण्यास जैविक बीजप्रक्रिया करावी. याकरिता ५०० मिली किंवा ५०० ग्राम पी.एस.बी., ५०० मिली किवा ग्राम  अॅझोस्पिरीलीयाम जीवाणू संवर्धक आणि ५०० ग्राम गुल प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेने अर्धा तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवडीकरिता वापरावे.


स्त्रोत: अॅग्रोवन
अंकुश सोनावले (कृषी सहायक, नागठाणे, जि.सातारा)
: ९४२०४८६५८७

Wednesday, April 11, 2018

पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन




पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे, क्षेंद्रिय आणि रासायनिक घटकांचा वापर करून चांगला नफा कमावण्यासाठी उत्कृष्ठ  गुणवत्तेचा भरपूर उत्पादन देणारा शेतमाल तयार करणे.

अन्नद्रव्यांची विस्तृत माहिती:


(माहिती वाचण्यासाठी लाल(Red) रंगाच्या अक्षरावर क्लिक करा)

१) मुख्य अन्नद्रव्य
२) दुय्यम अन्नद्रव्य
३) सूक्ष्म अन्नद्रव्य 
    अ) जस्त(झिंक Zn)
    ई) मंगल ( मॅगनीज Mn)

स्त्रोत : युनिमॅक्स डाळिंब तंत्रज्ञान

     ब्लॉग आवडला असल्यास कृषीदूत ला Follow करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया/ प्रश्न कमेंट्स च्या स्वरुपात आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया/ प्रश्नाचे योग्य पद्धतीने निरसन केले जाईल. 
      ब्लॉग बद्दल अपडेट्स तुमच्या ई-मेल वरती मिळवण्यासाठी तुमचा ई- मेल आइ-डी Enter your email address:  लिहलेल्या बॉक्स मध्ये टाईप करा.
कृषिदूत हा ब्लॉग शेतीसंभंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बनवण्यात आला आहे. 


Tuesday, April 3, 2018

शेतीतील गांडुळाचे महत्व (Importance of Earthworm at farming in Marathi)

शेतीतील गांडुळाचे महत्व 
(Importance of Earthworm at farming in Marathi)

गांडुळ हा शेतकर्‍यांचा मित्र आहे, असे शिकत आलो आहोत. परीक्षेत एक मार्क मिळण्यासाठी हे उत्तर उपयोगी पडते पण, प्रत्यक्षात शेती व्यवसाय करताना गांडुळ १०० मार्का इतका महत्त्वाचा आहे. आपण मात्र आपल्या या मित्राला विसरून शेती करीत आहोत. केवळ विसरूनच नव्हे तर त्याची उपेक्षा करून शेती करायला लागलो आहोत. एकवेळ तेही ठीक आहे पण आपण जिला शेतीची आधुनिक पद्धत म्हणतो ती तर आपल्या या मित्राच्या जीवावर उठणारी आहे. पुस्तकात आणि परीक्षेत गांडुळाला आपला मित्र म्हणायचे आणि प्रत्यक्षात शेती करताना त्याचा जीव घेणारी शेती करायची, अशी शेती यशस्वी कशी होईल ? गांडुळाला विसरून चालणार नाही. त्याची ओळख करून घ्यावी लागेल. त्याचा कसा आणि किती फायदा करून घेता येईल याचा विचार करावा लागेल. गांडुळ हा प्राणी कधी निर्माण झालाय याबाबत मतभेद आहेत पण तो माणसाच्या पूर्वी या सृष्टीत अवतरला आहे असे मानले जाते. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत.

गांडूळ हा एकलिंगी प्राणी आहे. 
म्हणजे एकाच गांडुळाचा निम्मा भाग नर असतो तर निम्मा भाग मादीचा असतो. त्यामुळे प्रत्येक गांडुळ अंडी घालत असतो आणि त्याची पैदासही मोठी असते. गांडुळ हा दवणे, वाळे, गेचवे, शिंदाडे, काडू इत्यादी नावांनी ओळखला जातो. जगभरामध्ये गांडुळाच्या ३ हजार जाती असून त्यातल्या ३०० जाती भारतामध्ये आहेत. गांडुळाची लांबी एक इंचापासून अगदी ८ ते १० इंचापर्यंत असते. गांडुळाचा जीवनक्रम, त्याच्या सवयी, त्याचे शरीर आणि त्याच्या पोटातली भट्टी या सर्वांचा अभ्यास केला असता या सर्व बाबी शेतीसाठी अतिशय उपकारक असल्याचे आढळले आहे. गांडुळ जन्मभर शेतकर्‍यांसाठी काम करत असतो. तसे माणूसही काम करतो परंतु माणूस आठ तास ड्युटी करतो. गांडुळ मात्र चोवीस तास ड्युटी करत असतो. विशेष म्हणजे त्या बदल्यात तो कसलाही पगार मागत नाही. करोडो रुपयांची गुंतवणूक करून एखादा कारखाना उभा केल्यानंतर त्यातून जेवढे रासायनिक खत तयार होईल त्यापेक्षा किती तरी जास्त आणि किती तरी उपयुक्त खत गांडुळ आपोआप निर्माण करत असतो.

गांडुळाची ओळख करून घ्या

गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही. कारण त्याला डोळे नसतात. त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते. जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते. ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते. परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते. निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे. या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते. त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते. अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते. तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते. ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना हवा भरपूर मिळते. पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

हे सारे करत असताना जमिनीतली माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळतो. विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो. गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते. त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो. मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात. गांडुळांची जन्म-मरणाची साखळी सुरू असते. शेकडो पिलांना जन्म देऊन एखादे गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकर्‍यांच्या उपयोगी पडते. गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो. त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के इतके प्रोटिन्स किंवा प्रथिने असतात. त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते. गांडुळाचा खत म्हणजे प्रामुख्यानेगांडुळाची विष्ठा.

या विष्ठेचे विश्‍लेषण केले असता  त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फूरद      हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत. जमिनीमध्ये सर्वसाधारणत: जेवढे जीवाणू असतात त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात. तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस्  असतात. हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात. त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात आणि पिकांवर पडणार्‍या रोगांवर इलाज करतात. गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे. त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात. गांडुळाचे हे सारे गुणधर्म पाहिले म्हणजे गांडुळ हा शेतकर्‍यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल आणि गांडुळाची मदत घेऊन शेती करणे कसे बिनखर्ची शेती करण्यास उपयोगाचे आहे हेही ध्यानात येईल. गांडुळाचे आणखी काही महत्वाचे उपयोग आहेत. ते पाहिले म्हणजे गांडुळाला वगळून शेती करणे हा किती मोठा अपराध आहे आणि हा अपराध करून आपण आपल्याच पायावर कसा दगड मारून घेत असतो हे लक्षात येईल.

आपल्या शेतात आपण पिकांना रासायनिक खते देतो. अशी तयार खते बाजारात मिळतात आणि ती पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे पिकांना ती दिली की, पाण्यात विरघळून तयार झालेले खतयुक्त पाणी झाडांची किंवा पिकांची मुळे शोषून घेतात. ही सारी प्रक्रिया एक-दोन दिवसात घडते. त्यामुळे रासायनिक खते पिकांना ताबडतोब लागू होतात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते. शेणखत किंवा गावखत यांची अवस्था अशी नसते. ती पटकन शोषून घेता येत नाहीत. शेतात पडलेले शेणखत, काडी-कचरा हे खत म्हणून पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नाहीत. मात्र ही खते किंवा शेतातले कोणतेही सेंद्रीय पदार्थ आधी गांडूळ खातो. त्याच्या पोटात निसर्गाने ठेवलेल्या भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते. ती खतयुक्त विष्ठा मात्र पाण्यात पटकन विरघळते आणि ते विष्ठायुक्त खत मात्र पिकांच्या मुळांना शोषून घेता येते. म्हणजे ही सारी प्रक्रिया घडायला काही वेळ लागतो. म्हणूनच आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रीय खते पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नसतात. परंतु ती पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम गांडूळ करत असतो. म्हणजे गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे. हा भटारखाना म्हणजे खताचा कारखाना सुद्धा आहे.

गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते भस्त करत असते. म्हणजे आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोेग दवाखाना म्हणून होत असतो. अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात. कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते. कीडींमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधे मारावी लागतात. त्या औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो. अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते. पहिला खर्च रासायनिक खताचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि औषधांचा. गांडूळ बिळ करून राहते आणि त्यासाठी माती उकरत राहते. त्याच्या या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातली माती वर येते आणि वरच्या थरातली माती खाली नेऊन सोडली जाते. मातीची ही अदलाबदल मृदशास्त्रानुसार पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारे काम कसलाही पगार न घेता करत असते.

नोट:  सदरची पोस्ट हि व्हाट्सअँप च्या कृषिसमर्पण या ग्रुपवरून कॉपी करून पोस्ट करण्यात आली आहे. 
कृषिदूत हा ब्लॉग शेतीसंभंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बनवण्यात आला आहे. 

Monday, April 2, 2018


महत्त्वाच्या विद्राव्य खतांचे कार्य...
(Information of water soluble fertilizer like 12:61:0, 13:0:45,19:19:19 etc.)
१९:१९:१९, २०:२०:२० -
या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.
१२:६१:० -
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते.नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.
०:५२:३४ -
या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत.फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.
१३:०:४५-
या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते.फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
०:०:५० १८ -
या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधक ही असतो.पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.
१३:४०:१३ -
पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.
कॅल्शियम नायट्रेट -​
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

​२४:२४:० -​
यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो

Friday, March 30, 2018

यशोगाथा: खरबूज लागवड तंत्र / kharbooj farming 2018

                         यशोगाथा: खरबूज लागवड तंत्रज्ञान
सुरेश आणि बलभीम देवकर-पाटील
गाव: सुगांव , ता. इंदापूर जि. पुणे.
संपर्क: 091684 82429
लागवड ते मालकाढणी कालावधी: ३ महिने
१) लागवड दि. २२/१२/२०१७
२) वाण: कुंदन
३) एकूण रोप: ८०००
४) प्रथम तोडा: ०८/०३/२०१८
५) सरासरी एकूण उत्पादन (एकरी) :२० टन
६) सरासरी दर:  १९ .
७) सरासरी एकूण उत्पन्न:  ३,८०,०००
८) सरासरी खर्च : १,००,०००.
९) निव्वळ नफा:  २,८०,०००

१०) मार्केट: मुंबई (वाशी)

https://youtu.be/-Su_VIYtX4E
#Subscribe #Like #Share